आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मुल शहरालगत क्रीडांगण परिसरात दोन बिबट्यांची एन्ट्री, फिरायला येणारे नागरिक धास्तावले”..

▪️तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी..!

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मुल – ( इंडिया 24 न्युज ) : मूल शहराला लागून असलेल्या कर्मवीर क्रीडांगण शेजारील झाडावर दोन बिबट्या बसलेले दिसून आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

सदर क्रीडांगणावर दररोज गावकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने फिरायला येतात. याशिवाय या परिसरात महाविद्यालय देखील असल्याने अनेक विद्यार्थी ये-जा करीत असतात. यापूर्वी सुद्धा अनेकदा बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे. या क्रिडांगणा च्या बाजूलाच रेल्वे स्टेशन. आहे. रेल्वे स्टेशनवर रात्रौ सुद्धा प्रवासी असतात. अश्यावेळी मानव आणि सदर बिबट यांच्यातील हल्ले नाकारता येणार नाही.वन विभागाने यावर तात्काळ उपाय योजना करावी. अशी कॉलेज विद्यार्थी, नागरिक, आणि रेल्वे प्रवाश्यांची मागणी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.