आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सा.बां. मंडळ क्र. ०२ कार्यालय, चंद्रपूर कामांसंदर्भात आढावा बैठक..

 

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूरातील सार्वजनिक बांधकाम मंडळ क्र. ०२ च्या कार्यालयात आज माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (मंडळ १ आणि २) कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली.

या बैठकीत बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा तसेच शासनस्तरावर पाठविलेल्या प्रस्तावांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यासोबतच सद्यस्थितीत प्राथमिकतेने करावयची कामे, रस्त्यांची दुरुस्ती, आणि नवीन पुलांच्या बांधकामांच्या प्रस्तावाबद्दल याठिकाणी सविस्तर चर्चा केली.
नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करून काम करण्याचे निर्देश देत रस्त्यांची गुणवत्ता राखणे आणि कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासंदर्भात सुद्धा यावेळी आवश्यक सुचना केल्या.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंडळ क्र. ०२ चे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, सार्वजनिक बांधकाम मंडळ क्र. ०१ चे कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, उपविभागीय अभियंता अभिषेक पुल्लावार, उपविभागीय अभियंता शुभम अडेटवार, उपविभागीय अभियंता सुनील कुबडे यांचेसह सर्व तालुक्यातील कनिष्ठ अभियंता व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.