आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️कोसंबी येथे विद्युत करंट लागून महिला ठार..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील मौजा कोसंबी येथील महिला गेडाम यांच्या शेतात निंदनाचे काम करण्यासाठी काही महिला मजुरीने गेल्या.शेतात इलेक्ट्रिक मोटर पंप लावलेला होता. मोटारपंपाचा आर्थिंग कटला असल्याने आर्थिंग वायरला करंटअसल्याचे कुणालाच माहीत नव्हते. एवढ्यातच निंदन करणारी महिला बेबीबाई भारत कावळे (६३) हिचा हात करंटअसलेल्या आर्थिंग वायरला लागल्याने जबर शॉक लागल्याने बेबीबाईचा जागीच मृत्यू झाला. तिच्या पश्चात मोठा परिवार असून पोटासाठी मजुरीला गेली असताना मृत्यू झाल्याने कोसंबी गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पोटासाठी वन मजुरी करतांना मृत्यू झाला असून शासनाने गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



