▪️ अटल दहशत माजविणारा धारदार तलवारीसह एकाला अटक, एक फरार..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या युवकास LCB स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तीन स्टीलच्या धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून सुमारे 3 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटक असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
रामनगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा क्र. 779/2025 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अंतर्गत कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपी धीरज बबलू यादव (वय 32, रा. लखमापूर, चंद्रपूर) असा असून त्याच्यासोबतचा दुसरा साथीदार राहुल हा सध्या फरार आहे.
दि. 23 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात अवैध धंद्यावर कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, आरोपी धीरज यादव हा वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात स्टीलची तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे समजले. तात्काळ पथकाने पंचासमक्ष धीरज यादवला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून तीन स्टीलच्या धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या.
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी राहुल हा सध्या फरार असून, त्याचा शोध पोलीस पथक घेत आहेत.
सदर कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निभोरकर, सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंह, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे आणि दिनेश अराडे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.



