आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांनी सावध राहावे..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : हवामान विभागाने विदर्भातील नागरिकांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भात पावसाची तीव्रता व वितरण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२४ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यावेळी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळ, तसेच ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सततच्या पावसामुळे नद्यांमध्ये व नाल्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचे तसेच वीज पडण्याच्या घटनेपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवून सुरक्षितता बाळगावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.