▪️मारोडा येथे रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मूल – ( इंडिया 24 न्यूज) : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियांनातर्गत मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान व आरोग्य शिबीर 25 सप्टेंबर रोजी सकाळी पार पडला.
शिबीराचे उद्घाटन मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चनफने यांच्या हस्ते पार पडला. शिबीराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर बावणे, मारोडा ग्राम पंचायतचे उपसरपंच अनुप नेरलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत चन्नावार, डॉ. रोहीत कुमार, नितीन झोडे, महादेव जांभुळे, सुरेश ठिकरे, कपिल बोरेवार, संदीप संतोषवार उपस्थित होते.
यावेळी 14 रक्तदात्यांनी रक्तदान केले, शिबीरात मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना उबाठाचे मूल तालुका सोशल मिडीया प्रमुख शिवम चल्लावार यांनी रुग्णांना फळे आणि बिस्कीटांचे वाटप केले. व रुग्णांना मार्गदर्शन केले.
यावेळी गर्भवती महिला व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



