▪️चामोर्शी शहराच्या बाहेरून बायपास रस्ता काढा..
▪️उपविभागीय अधिकारीयांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : ते गडचिरोली नॅशनल हायवे 353 सी या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात
सुरजागड लोहप्रकल्प जड वाहणे शहरातून ये जा करत आहेत.त्यामुळे त्यां वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे तर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.यामहामार्गावर चामोर्शी येथे
कृषक हायस्कूल ,शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, यशोधरा महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा मुख्य मार्गावर असून राष्ट्रीय महामार्ग 353 सी चामोर्शी मध्ये मुख्य चौका चौका मध्ये स्पीड ब्रेकर लावण्यात यावे त्या मुळें तरी अपघात होण्याची शक्यता कमी होईल व शाळकरी मुलांना सुद्धा धोका कमी निर्माण होईल त्यासाठी संभाव्य धोका लक्षात घेता शहरा बाहेरून
बायपास नॅशनल हायवे काढण्यात यावे करीता येथील उप विभागीय अधिकारी
अरुन एम यांना येथील
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
चे तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवार उपप्रमुख चंद्रभुषण वालदे शिवसेना तालुका गटप्रमुख सुरज नैताम,सचिव संतोष कटारे,संपर्क प्रमुख राजू राऊत,आणि प्रा. प्रदीप भाडेकर, शिवसेना सदस्य राजू धोडरे, सत्यवान पिपरे,आदीच्या शिष्टमंडळाने निवेदन देत चर्चा केली असता येत्या आठ दिवसात प्रत्येक चौकात स्पीड ब्रेकर लावण्याचे निर्देश देण्यात येईल असे संगत बायपास बद्दल नॅशनल हायवे प्रशासना कडे पाठपुरावा करणार असेही सांगितले.