▪️भाऊंचा गरबा’ महोत्सव उत्साहात पार पडला..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
मुल – ( इंडिया 24 न्युज ) : मुल येथे आयोजित ‘भाऊंचा गरबा’ महोत्सव उत्साहात पार पडला. या प्रसंगी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी “गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्या कामाचे खरे समाधान आहे” असे भावनिक उद्गार काढत वंचितांसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या की, “आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला देशाला हेवा वाटेल असा विकास केला असून, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र, आरोग्य, शिक्षण, वनसंवर्धन आणि महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रांत त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. म्हणूनच त्यांना ‘विकासपुरुष’ म्हटले जाते.” त्यांच्या या गौरवोद्गारांनी महोत्सवाचे वैभव अधिक खुलले आणि वातावरणात अभिमानाची लहर संचारली.



