▪️तब्बल १३फुटाचा सापडला अजगर! सर्पमित्रांचे केले सर्वत्र कौतुक

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील जुनासुर्ला परिसरातील शेतकरी संजय आकुलवार यांचे शेतात असलेल्या १३ फूट लांबीचा प्रचंड अजगर आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. कामगारांना हा अजगर दिसताच तातडीने त्यांनी सर्पमित्रांना संपर्क केला. क्षणाचा विलंब न लावता सर्पमित्रांनी शेतात मध्ये धाव घेऊन त्या अजगराचे सुरक्षित रेस्क्यू केले.
संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, दिनेश खेवले व तरूण उपाध्ये यांनी सुरक्षीत पणे अजगरास पकडले. या वेळी त्या ठिकाणी जुनासुर्ला चे सरपंच रणजित समर्थ व गावकरी उपस्थित होते. धाडसी सर्पमित्रांनी अतिशय कौशल्याने व धाडसाने अजगराला सुरक्षितरीत्या बाहेर काढून जंगल परिसरात सोडले.
सर्पमित्रांच्या योग्य हाताळणीमुळे कोणतीही दुर्घटना न घडता अजगराचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.
सर्पमित्र प्रशांत मुत्यारपवार, दिनेश खेवले व तरूण उपाध्ये यांनी सांगितले की, साप, अजगर यांच्यापासून माणसाला धोका नसतो. ते आपल्या परिसंस्थेतील संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सर्प दिसल्यास तातडीने सर्पमित्रांना कळवावे. या धाडसी बचावकार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांचे मनापासून कौतुक केले.



