▪️आदर्श पुरस्काराने अशोक जाधव सन्मानित..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : विजया दशमी आणि गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शुभ पर्वावर यहोव यिरे फाऊंडेशन वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वसंतराव नाईक सभागृहात धरमपेठ नागपूर येथे अशोक जाधव सर यांना 225 वा पुरस्कार प्राप्त झाला असून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीच्या पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मा श्री रामदास जी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे होते तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेत्री एलिना तुतेजा सिमरन आहुजा अभिनेत्री प्रमुख अतिथी अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स डी के आरीकर संपादक हे होते या सोहळ्यात एकुण 75 व्यक्तीला आदर्श पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले प्रसिद्ध गायक डॉ सुनील जी चव्हाण यांनी स्त्री व पुरुष आवाजात गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे आयोजन मा श्री डॉ रमेश जी बोरकुठे संस्थापक सी ओ यांनी केले तर आभार प्रदर्शन एलिना बोर कुठे यांनी केले आणि अश्विनी पुरी यांनी सुंदर अशा शैलीत संचलन करून उपस्थितांची दाद मिळवली.



