आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर पोलीसांची सर्वात मोठी कारवाई आरोपी अटक..

▪️५२८ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, ३५,०७,४८०/- रू मुद्देमाल जप्त..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) दि.०५/१०/२०२५ रोजीचे दुपारी १४.०० वा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्तबातमीदराकडुन माहिती मिळाली की, आज दुपारी वसीम इमदाद खान, रा. मुंबई हा त्याची कार कंमाक एमएच-१० ईक्यु ०४२१ ने चंद्रपरात एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडर विकी करीता घेवुन येणार आहे. अशा माहितीवरून नागपूर चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग कंमाक ३६३ वरील साखरवाही फाट्याजवळील एच.पी पेट्रोल पंप समोर येथे सापळा रचुन आरोपी नामे वसीम इमदाद खान, वय ३७ वर्ष, रा. बैगनवाडी रिक्षा स्टॅण्डजवळ, साईबाबा मंदिर, गोंवडी मुंबई यास कार एमएच-१० ईक्यु-०४२१ सह पकडण्यात आले. आरोपी वसीम इमदाद खान यांचेकडुन एका प्लास्टिकच्या प्रेसलॉक पन्नीमध्ये एम.डी (MEPHEDRONE) सदृश्य पांढरे रंगाचे ड्रग्ज पावडर, पन्नीसह निव्वळ वजन ५२८ ग्रॅम, बाजारभावानुसार प्रति ग्रॅम किमंत ५०००/-रू, एकुण किं २६,४०,०००/- रू पन्नीसह, वापरते मोबाईल, रोख रक्कम व कार असा एकुण ३५,०७,४८०/- रू मिळुन आल्याने गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीवर पोलीस स्टेशन पडोली जि. चंद्रपूर येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आले आहे. सन २०२५ मध्ये एन.डी.पी.एस अधिनियम अन्वये चंद्रपूर जिल्हयात एकुण १५७ गुन्हे नोंद करून १९२ आरोपीवर कार्यवाही करण्यात आली आहे. आरोपीकडुन एकुण ८०,५९,७७४/- रूपये चा माल जप्त करण्यात आला आहे.
गांजा विकीकरीता बाळणारे आरोपीवर २६ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ५५.२४ किलो गांजा जप्त करून ४० आरोपीवर कार्यवाही करून ६,६२,१६४/- रू चा माल जप्त करण्यात आला.

एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडर बाळणारे आरोपीवर १४ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ७२२.६१४ ग्रॅम एम.डी ड्रग्ज पावडर जप्त करून ३१ आरोपीवर कार्यवाही करून ४३,७८,०६०/-चा माल जप्त करण्यात आला.

ब्राउन शुगर पावडर बाळणारे आरोपीवर ०१ गुन्हा नोंद करण्यात आला असुन २९८ ग्रॅम ब्राउन शुगर पावडर जप्त करून ०२ आरोपीवर कार्यवाही करून ३०,१९,५५०/- रू चा माल जप्त करण्यात आला.
▪️अंमली पदार्थ सेवन करणारे आरोपीवर १५६ गुन्हे नोंद करण्यात आले असुन १८६ आरोपीवर कार्यवाही करण्यात आली.▪️चंद्रपूर जिल्हा नशामुक्त करण्यासाठी नशामुक्त अभियान राबविण्यात आले असुन विविध कार्यकम राबविण्यात आले आहे. ▪️शाळा, कॉलेजमध्ये नशामुक्ती अभियान संदर्भाने SAY NO TO DRUGS, YES TO LIFE व्याख्याने घेण्यात आली.▪️ चंद्रपूर जिल्हा तसेच पोलीस स्टेशन स्तरावर सायकल रॅली काढण्यात आली.

➤ चंद्रपूर जिल्हयात विविध ठिकाणी ध्यानशिबीर, रॅली, पोस्टर, निंबध स्पर्धा घेण्यात आले. ▪️१५ ऑगस्ट २०२५ रोजी मा.श्री. अशोक उइके, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री चंद्रपूर यांचे हस्ते नशामुक्ती अभियानचे फ्लेक्सचे अनावरण करण्यात आले. ▪️चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनचे मुख्य स्थळी नशामुक्त अभियान संदर्भाने फ्लेक्स व फलक लावण्यात आले. ▪️होमगार्ड सैनिक, स्थानिक स्वयंसेवक संघटना, युवा मंडळे, महिला समिती यांना नशामुक्ती अभियानामध्ये सहभागी करून नशामुक्ती अभियानाचे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

➤ चंद्रपूर जिल्हयात गणेश महोस्तव व नवरात्र दरम्यान नशामुक्त अभियान संदर्भाने फ्लेक्स व फलक लावण्यात आले.

▪️जाहिर आवाहन

चंद्रपूर पोलीसातर्फ चंद्रपूर जिल्हयांत नशा मुक्त अभियान DRUG FREE CHANDRAPUR CAMPAIGN हा भारत सरकारचा आणि राज्य सरकारचा एक महत्वपुर्ण उपक्रम आहे, ज्याचा उद्देश समाजातुन व्यसनमुक्ती घडवुन आणणे विशेषः युवकामध्ये नशाच्या सवयीचा प्रसार थांबविणे आहे. तरी सर्व नागरिकांनी अवाहन करण्यात येत की, अंमली पदार्थ संबंधाने कोणतीही माहिती असल्यास डायल ११२ अथवा ७८८७८९०१०० या मोबाईल कंमाकावर कळवावे. आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

सदरची कार्यवाही मा.श्री. सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, बलराम झाडोकार सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा / सुभाष गोहकार, पोहवा/इम्रान खान, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनीकांत पुठठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोशि/हिरलाल गुप्ता, पोशि/शंशाक बदामवार, मपोहवा/विजयमाला वाघमारे, चालक पोहवा/प्रमोद डंभारे, व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.