आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विश्वातील नेत्यांना कविता शिकवल्यास जगात शांती नांदेल : डॉ. विनोद आसुदानी यांचे कवितेच्या घरी भाष्य.

▪️कवयित्री मेघना साने यांचे विदयार्थ्यांशी हितगुज

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

वरोरा – ( इंडिया 24 न्युज ) : बुद्धाची करुणा हाच खरा कवितेचा आत्मा असतो.जगाला एटम्ब बॉम्ब ची गरज नसून,बुद्धाच्या शिकवणीची गरज आहे.जगातील भूक आणि अहिंसा जर समाप्त झाली तर विश्वात शांती,मानवता नांदेल.कविता अमर असते.कवितेची ताकद खुप असते.डिजिटल माध्यमातून कविता संपूर्ण जगभर पोहचत असते.विश्वातील नेत्यांना कविता शिकवल्यास जगात शांती नांदेल,असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी डॉ.विनोद आसुदानी यांनी केले.

शेगांव बु,चंद्रपूर येथील कवितेच्या घरी शनिवार ता.४ऑक्टोबर रोजी बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.याप्रसंगी सुप्रसिद्ध कवयित्री,निवेदिका अभिनेत्री मेघना साने,मुंबई,उद्योजक प्रकाश पद्मावार,श्रीकांत पेटकर,विकास जवादे,किशोर पेटकर,विनोद वरभे यांची उपस्थिती होती.केजी ते पीजी पर्यत सर्वांना कविता शिकवायला हवी.त्यामुळे जीवन सुधारू शकते,असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात मेघना साने यांनी शालेय मुलांशी हितगुज साधले.कविता गाऊन,कथा सांगून कार्यक्रमात रंगत आणली.मुलांनी सहभाग दर्शवत धीटपणे काही रचना सादर केल्यात.अभिनय,कला या मुलांच्या पुढच्या आयुष्यात सतत कामी येतात असेही त्या म्हणाल्या.
दुसऱ्या सत्रात
श्रीकांत पेटकर यांनी कवितेच्या विविध उपक्रम,स्पर्धा याबाबत माहिती दिली.
राज्यस्तरीय काव्य पुरस्कार स्पर्धेतील उत्तम काव्य,गझल,बालकविता विभागातील प्रभू राजगडकर,गजानन वाघमारे,प्रसेनजित गायकवाड यांना रोख रक्कम,प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.काही विशेष काव्यसंग्रहात किरण भावसार,नंदकिशोर दामोदरे,मोहन काळे यांच्या संग्रहाला पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार विजेत्या कवीनी या सत्काराला उत्तर देताना हा मानाचा पुरस्कार असल्याचे सांगितले.

विरार,मुंबई येथील प्रा.भीमराव पेटकर यांच्या “आयुष्याच्या वळणावर” या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले. भीमराव पेटकर यांनी आपला अनुभव सांगितला.
यानंतर “स्थळ” या मराठी चित्रपटावर समीक्षा स्पर्धेतील विजेते गौरकर,आदित्य देशमुख, पंडीत लोंढे आणि निलेश चवले यांना पाहुण्यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच ऑनलाईन शिवाजी महाराज जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेचा
नारायण वरभे पुरस्कार मुलांना वितरित करण्यात आला.

तिसऱ्या सत्रात विदर्भातील विविध प्रकारात साहित्यिक योगदान दिल्याबद्दल
दिपक शिव,डॉ.माधुरी मानवटकर,गोपाल शिरपूरकर,
प्रब्रम्हानंद मडावी,वैशाली रामटेके,परमानंद तीराणिक,राजरत्न पेटकर,पंडीत लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
दिवसभर अशा भरगच्च कार्यक्रम लक्षात राहण्यासारखा ,उच्च पातळीचा झाल्याचे श्रोते मंडळी बोलत होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यात डॉ.प्रमोद नारायणे,डॉ.संदीप भेले,राजू मांडवकर,नितीन वैदय,रामटेके कुटुंब यांनी मेहनत केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.