आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर हल्ल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्यात निदर्शन : राष्ट्रपतींना निवेदन..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

भंडारा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ९ ऑक्टोबर २०२५, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांच्यावर अधिवक्ता अ‍ॅड. राजेश किशोर तिवारी यांनी भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने भंडाऱ्यात जोरदार निषेध नोंदविला. पक्षाने या प्रचंड गंभीर घटनेमुळे देशाच्या न्यायव्यवस्थेची आणि भारताच्या सामाजिक प्रतिष्ठेची मोठी हानी झाल्याचे सांगत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

पक्षाच्या जिल्हाध्यक्ष भिमराव टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना हा प्रकार कळविण्यात आला आहे आणि अ‍ॅड. तिवारी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

निवेदन सादर करण्याच्या वेळी रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर मोठी संख्या कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये प्रवीण नागपुरे, अमर निमजे, श्याम ठवकर, प्रवीण मोहतुरे, नत्तथु उईके, युनुस भाई, शैलेश मोहतुरे, राकेश गजभिये आदींचा समावेश होता.

पक्षाच्या घोषणेनुसार, “देशाच्या न्यायव्यवस्थेचा अपमान करणाऱ्यांना कुठलाही राजकीय आश्रय न देता कठोरात कठोर शिक्षा मिळावी; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” अशी स्पष्ट इशाराही देण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.