आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️कर्मवीर महाविद्यालय मुल येथील उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम..

▪️बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90.87 टक्के निकाल..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727

मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय मुल येथील जाहीर झालेल्या मार्च 2026 च्या परीक्षेत इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90. 87% निकाल देऊन दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. कला शाखेत 217 पैकी 191 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 88.01% निकाल लागला आहे. तर वाणिज्य शाखेत 68 विद्यार्थी पैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.कला शाखेतून सर्वाधिक गुण प्राप्त करून मयूर संजय दयालवार यांनी 73.17% गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. तर वाणिज्य ( कॉमर्स) शाखेत सर्वाधिक गुण प्राप्त करून कु. प्रणिता शंकर राऊत यांनी 78.50% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आली आहे. एकंदरीत कर्मवीर महाविद्यालयाने आपल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. दोन्ही शाखेतून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष एड. अनिलजी वैरागडे, सचिव शशिकांतजी धर्माधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. अनिता वाळके तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक दिनेश बनकर यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.