आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना २.५० कोटींची मंजुरी..!

▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांनी दिली हिरवी झेंडी..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १५ राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना २५१५ लेखाशीर्ष योजनेअंतर्गत २.५० कोटी (दोन कोटी पन्नास लाख रुपये) निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निधीमुळे मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना आता गती मिळणार आहे.

आमदार देवराव भोंगळे यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री ना. जयकुमारजी गोरे यांच्याकडे मतदारसंघातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रभावी पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

🔸मंजूर कामांमुळे विकासाला नवी दिशा..

मंजूर झालेल्या २.५० कोटींच्या निधीतून मतदारसंघातील
राजुरा तालुक्यातील रामपूर येथे योग भवन बांधकाम करणे, रामपुर येथील वार्ड क्र. ४ येथील सौ. मंजुषा लांडे ते श्री. बाळकृष्ण तानकर यांचे घरापर्यंत सी. सी. रोड बांधकाम करणे, भुरकुंडा येथे (R.O) जलशुद्धीकरण यंत्र बसविणे, जेवरा अंतर्गत तुकडोजीनगर येथे शरीफ पठाण यांच्या घरापसुन ते अरुण चौधरी यांच्या घरापर्यंत सि. सी. रोड बांधकाम करणे, जेवरा अंतर्गत तुळशी येथे जलशुद्धीकरण यंत्र (आर.ओ प्लांट) बसविणे, कन्हाळगाव येथे कांचनबाई बोधनकर ते प्रफुल बुऱ्हाण यांच्या खाली जागेपर्यंत सि.सी. रोड बांधकाम करणे, कन्हाळगाव येथे मीराबाई खनके ते सुरेश दोरखंडे यांच्या गोठ्यापर्यंत बंदिस्त नाली बांधकाम करणे, धानोली ग्रा.पं. अंतर्गत धानोली मोठा तांडा येथे मंदिर परीसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, धानोली मोठा तांडा येथे जि.प. शाळा ते दिगंबर राठोड यांच्या घरापर्यंत सि.सी. बंदिस्त नाली बांधकाम करणे, जिवती तालुक्यातील मौजा पालडोह ग्रा.प. चिखली खु. ता.जिवती येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, राहपल्ली खु. येथे सामाजिक सभागृह बाधकाम करणे, पिटीगुडा नं. ०२ येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, मरकागोंदी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, करनकोंडी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, पल्लेझरी येथे संत सेवालाल मंदिर जवळ सामाजिक सभागृह बांधकाम करणे, गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे सुनील पाल ते येमाजी येलमुले सि.सी रोड बांधकाम करणे, चेकपिपरी येथे रुषी बडरोवार ते जि.प शाळेपर्यंत सि. सी. रोड बांधकाम करणे, धानापूर येथे रामचंद्र झाडे यांच्या घरापासून ते सामजिक सभागृह पर्यंत सि.सी. रोड बांधकाम करणे, विठ्ठलवाडा येथे प्रशांत पोतराजे यांच्या घरापासून ते घनशाम पोतराजे यांच्या घरापर्यंत सि.सी रोड बांधकाम करणे, भनारहेटी येथे बापुजी पिंपळकर यांच्या घरापासून ते आनंदराव पावडे यांच्या घरापर्यंत सि.सी. रोड बांधकाम करणे, सालेझरी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ सौंदर्याकरण करणे आणि गणेशपिपरी येथे हनुमान मंदिर ते रमेश ढोबे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नाली बांधकाम करणे यांसारखी महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

आमदार भोंगळे यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री मा. जयकुमारजी गोरे यांचे आभार मानले आहेत. हा निधी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि विधानसभेतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, लवकरच या विकासकामांचे भुमिपुजन पार पडून ही कामे पूर्णत्वास येतील अशी अपेक्षा आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.