आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महिलांचे आरक्षण ठरणार केंद्रबिंदु आणि मतदारांच्या अपेक्षा..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगरपरिषद क्षेत्रातील निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून रोष्टर प्रक्रिया पार पडली असून या रोष्टर मधून १० प्रभागा साठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये २० नगसेवक पदांसाठी निवडणूक होणार आहे.मुख्य म्हणजे नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण सर्व साधारण महिला साठी आरक्षित आहे.
या निकालामुळे काही पुरुष उमेदवारांचे मन खट्टू झाले असले, तरी महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकीय सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या न. प.निवडणुकीत कोण महिला उमेदवार रिंगणात उतरणार, कोण अध्यक्षा पदावर विराजमान होणार आणि कोणते सदस्य निवडून येणार, यावर सध्या मूल नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
मूल नगरपरिषद क्षेत्रात सध्या पिण्याचे गढूळ पाणी, आरोग्य , सौंदर्यकरण, स्वच्छता, रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, रस्त्यावरील जनावरांमुळे होणारे अपघात, झोपडपट्टी मधील अतिक्रमित जागेचे पट्टे इत्यादी प्रश्न आवासून उभे आहेत.
नगरातील अनेक वॉर्डात फेरफटका मारले असता उमेदवार हा सर्वसामान्य, प्रामाणिक व जनतेच्या हिताचा विचार करणारा असावा, तसेच शहरातील नागरिकांचे दुर्लक्षित प्रश्न सोडविणारा असावा अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली.
या न. प.निवडणूकीमुळे शहराच्या प्रगतीचा मार्ग ठरतो. सध्या मतदारांमध्ये विकासकामे, नेतृत्वाची निवड, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोध यावर चर्चा सुरु असून उमेदवारांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे स्थानिक राजकीय नेतेही सावध भूमिका घेणार असून सर्वांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सध्या तरी दिसून येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.