आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सिंधी समाज मंडळ अध्यक्ष, सचिव तथा सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल..

खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप : भूतपूर्व माजी नगरसेवक बलराम डोडानो

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : सिधी समाज मंडळ, च्या चंद्रपूरच्या २०२४-२५ कार्यकारिणी निवडणुकीत मृतांना जिवंत दाखवून त्यांच्या स्वाक्षरी घेऊन बनावट दस्तऐवज तयार करणे आणि फसवणूक केल्या प्रकरणाची तक्रार माजी नगरसेवक बलराम डोडानो यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.

या तक्रारीच्या आधारावर याप्रकरणी सिंधी समाज मंडळाचे अध्यक्ष ज्ञानचंद वलिराम टहलियानी, सचिव अशोक दरियानुमल हासानी, सदस्य लालचंद हासाराम पंजवानी, सदस्य दिलीप मुलचंद जेठवाणी मुलेचंद, दयालदास चंचलदास मंघानी, सुरेश दयाराम हरिरामानी, सुरेश रामचंद्र आहुजा, राजकुमार गोविंदराम
लेखवानी, संजय सेरमल रोहरा, संजय जीवतराम उदासी या ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भूतपूर्व माजी नगरसेवक तथा सिधी समाजाचे बलराम प्रभुलाल डोडाणी (६१) यांनी स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. मंडळाचे टहलियानी आणि सचिव अशोक हासानी तसेच सदस्यांनी संगनमताने मृत सदस्यांच्या नावावरून खोटी कागदपत्रे तयार करून निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, काही सदस्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यात आली. त्यांच्या नावाने बनावट स्वाक्षऱ्या दाखवून मतदान करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.