आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घणसोली येथील श्री. गुरुदेवदत्त सोसायटीतील दागिन्यांच्या दुकानात जबरी चोरी…

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधि

नवी मुंबई : (इंडिया २४ न्यूज) : घणसोली नोड मधील सेक्टर ७ येथील श्री.गुरुदेवदत्त सोसायटी मधील दागिन्यांच्या दुकानात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली. दुकानाचे शटर गॅस कटरच्या साह्याने कापून दुकानात प्रवेश करून सुमारे वीस लाखाचा ऐवज चोरून नेला असे भाग्यश्री ज्वेलर्स दुकानाचे मालक यांनी सांगितले. चोरी करताना दुकानातील कॅमेरा तोडण्यात आला त्यामुळे चोरी करणाऱ्याची माहिती मिळू शकली नाही. गेल्या महिन्याभरातील घणसोली मध्ये हा दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार घडला आहे. आताही सदर सोसायटी चे कॅमेरे चा माध्यमातून पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. उर्वरित तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ढाकणे करीत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.