आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️वंचित बहुजन आघाडी ची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

▪️नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४न्यूज ) : वंचित बहुजन आघाडी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार असून, प्रत्येक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. तावाडे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकसंदर्भात रणनीती, संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांचे सक्रिय योगदान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मूल तालुकाध्यक्ष ऍड. रितेशजी मारकवार यांचेशी चर्चा केली असता, वंचित बहुजन आघाडी हीं सामाजिक न्याय, समता आणि संविधानाच्या मुल्यावर उभी राहिलेली चळवळ आहे. सत्ताधाऱ्यांच्या अपयशाविरोधात जनता सजग झाली असून, आता सत्ता परिवर्तनाचा निर्णायक काळ आला आहे, असेही ते म्हणाले.जिल्हास्तरावरील झालेल्या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पक्षाचा ताबा मिळाविण्यासाठी ठोस नियोजन आखण्यात आले असून पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ऍड. रितेश मारकवार यांनी सांगितले.

सोबतच मूल तालुक्यातील जि. प.गट व पं. स.गणांसाठी पुढील प्रमाणे इच्छुकांची नावे चर्चेत असल्याचे ते म्हणाले.

सौं.अश्विनी रितेश मारकवार : जुनासुर्ला पं. स. गण
दिलीप वाळके :- सुशी पं. स. गण
डॉ. प्रवीण गावतुरे :-सुशी – चिचाळा जि. प. गट
ऍड. रितेश मारकवार बेंबाळ :- बेंबाळ पं. स. गण
एकंदरीत वंचित बहुजन आघाडी ही बहुजनांच्या, अल्पसंख्य समाजाच्या, रंजल्या गांजल्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी तसेच मूल तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडणुकीत स्वबळावर उतरणार असल्याचे श्री. ऍड. रितेश मारकवार तालुकाध्यक्ष यांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.