आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते गोवरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील गोवरी येथे (दि.२७) ला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या नवीन इमारतीमुळे गाव व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सक्षम,आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होणार आहे.

या प्रसंगी आमदार भोंगळे म्हणाले की, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. गोवरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज उपकेंद्र उभारले जाणार असून यात औषध साठवण कक्ष, प्रसूती कक्ष, तपासणी खोली, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल. यामुळे या परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार गावातच मिळतील आणि शहराच्या ठिकाणी रुग्णालयात जाण्याचा त्रास कमी होईल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर,जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे,महामंत्री हरिदास झाडे, ग्राम पंचायत सदस्य शंकर बोढे, भाजपा महिला मोर्चाचे राजुरा तालुकाध्यक्ष पौर्णिमा उरकुडे, महामंत्री हर्षल वनकर,भूषण जूनघरी, रोशन बोबडे, वैभव काळे, प्रशिल वनकर ,अमित उरकुडे,कुणाल काळे, उमेश उरकुडे ,सचिन पाचभाई, मनोज वासाडे, धनंजय झाडे, सुजल लांडे, मारोती उरकुडे,विनायक पिंपळकर, मनीषा उरकुडे, पर्वताबाई बाविस्कर, कोमल बल्की, आशा उरकुडे, हेमलता इटनकर,आशा झाडे, शारदा लांडे, यांचेसह गोवरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.