▪️चामोर्शी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.. राहुल वैरागडे यांचा सरकारला इशारा..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : सरकारने तात्काळ सरसकट आर्थिक मदत जाहीर करून ‘ओला दुष्काळ घोषित केला नाही, तर राज्यातील परिस्थिती कृत्यअश्रू शेतकरी आता एकवटले आहेत. शेतकरी आता थांबणार नाही असा इशारा राहुल वैरागडे यांनी दिला आहे. त्यामुळे संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तसेच तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी त्यांची मागणी आहे.विलास चिचघरे, हेमंत कोवासे, रवींद्र सुरपाम , वसंत राऊत,निखिल धावरे , यशवंत साखरे, अजय नैताम, रितिक पिपरे, पंढरीनाथ सातपुते, राकेश खोबे,यांनी प्रशासनासोबत चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “आपण सगळ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. शासन दरबारी मी स्वतः आवाज उठवून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देईन.” मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, बाजारातील घसरलेले दर आणि सरकारी आश्वासनांतुन होणारी फसवणूक यामुळे शेतकरी संकटात आहेत. तसेच, सध्या सुरु असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे.”याची मागणी कृषिमंत्री दत्ता भरणे साहेब उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनातून शासनाकडे मागणी केली आहे.



