▪️माऊली लेबोरेटरी गडचिरोली तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : पहिले वर्षपूर्तीनिमित्त दि. 02/11/2025 रविवार ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून गडचिरोली शहरातील माऊली लॅबोरेटरी तर्फे आपल्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य सेवा दिली,ज्यातून नागरिकांना मोफत तपासणीचा लाभ मिळाला.ज्यामुळे लोकांना वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळाले आहेत.यामध्ये आरोग्य संबंधित विविध प्रकारचे तपासणी अगदी मोफत करण्यात आले,त्यात ब्लड प्रेशर,मधुमेह,हिमोग्लोबिन व इतर तपासणी अगदी मोफत करण्यात आली.शिबिरात एकूण 35 लोकांनी आपली मधुमेह,हिमोग्लोबिन तपासून घेतली.या शिबिराकरिता माऊली लेबोरेटरी गडचिरोली चे संचालक स्वप्नील चापळे या आधी पण अश्याच प्रकारचे विविध प्रकारचे आरोग्याविषयक शिबीरे आयोजित करून लोकांना आरोग्य विषयक तपासणी करण्याकरिता प्रोत्साहित केलेले आहे.शिबिरात आरोग्य विषयक समस्येचे निराकरण करण्यास डॉ. आकाश डोंगरवार यांनी मार्गदर्शन केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील चापळे, डॉ. आकाश डोंगरवार,डॉ.नेहा डोंगरवार, आशिष दूधबळे, नेहा सलाम, स्वाती भांडेकर,विपलव, हिमांशू,रेश्मा,वर्षा,निकिता, वैष्णवी,समीक्षा,डेव्हीड,अंकित आदिनी सहकार्य केले.



