आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️रामनगर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई अट्टल चोर कुख्यात आरोपींकडून चोरीच्या 5 मोटारसायकल जप्त..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने कुख्यात मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीवर धडक कारवाई करत एकूण ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई रामनगर पोलीस पथकाने तांत्रीकदृष्ट्या, कौशल्यपूर्ण तपास करून यशस्वी पार पाडली.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी चंद्रहास अर्जुन मुन (रा. शामनगर, चंद्रपूर) यांची हिरो होंडा सी.डी. डिलक्स (एमएच ३४ डब्ल्यू ६७२४) मोटारसायकल बंगाली कॅम्प परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने परिसरातील CCTV फुटेज तपासून आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपी गोपाल जिवन मालाकार (वय ३०, रा. शामनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) व आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख (वय २२, रा. फुटक नगर, एकता नगर, चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी केल्यावर त्यांनी चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ५ चोरीच्या मोटारसायकली एकूण अंदाजे ₹१,६०,००० किंमतीच्या जप्त करण्यात आल्या.
जप्त वाहने
हिरो होंडा सी.डी. डिलक्स (एमएच ३४ डब्ल्यू ६७२४)
होंडा अॅक्टीव्हा ६जी (बिना नंबर)
सुझुकी Access 125 (एमएच ४९ ए.वाय. ८५९२)
हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच ४९ सी.एन. २३२०)
हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच ३४ बी.एल. ६२४२)
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंमका, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी. देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे तसेच पो.हवा. आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालु यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, म.पो.हवा. मनिषा मोरे आणि इतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.