▪️किरकोळ वादावरुन 27 वर्षीय युवकाचा निघू॔न हत्या.. शांताराम पोटदुखे विधीमहाविद्यालय परिसरात घटली घटना..
▪️अवघ्या एक तासाचे आंत खुनाच्या गुन्हयातील सर्व आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस स्टेशन ची कामगिरी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक २३ ऑक्टोंबर, २०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील विधी महाविद्यालय समोरील परिसरात एक इसम रक्तबंबाळ व मृत अवस्थेत पडुन असुन मृत इसमाचे नांव नितेश वासुदेव ठाकरे वय २७ वर्ष रा. वार्ड क्र.१ बेताल चौक, दुर्गापूर असे असल्याचे समजले. अशी माहिती मिळताच पोनि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोनि पो.स्टे. रामनगर हे पोलीस स्टॉफ सह घटनास्थळी पोहचुन परिसरात विचारपुस करुन सदर गुन्हयातील आरोपीचे शोध कामी स्थागुशा आणि रामनगर पोस्टे चे वेगवेगळे पथके तयार करुन शोध कार्य सुरु केला.
झाले असुन आरोपी क्रमांक (१) करण गोपाल मेश्राम वय २२ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर (२) यश छोटेलाल राऊत वय १९ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर (३) अनिल रामेश्वर बोंडे वय २२ वर्ष रा. समता नगर दुर्गापूर (४) प्रतिक माणिक मेश्राम वय २२ वर्ष रा. वार्ड क्र.४ दुर्गापूर (५) तौसिक अजीज शेख वय २३ वर्ष रा. फातेमा मस्जीद जवळ वार्ड क. ३ दुर्गापूर (६) सुजीत जयकुमार गणविर वय २५ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर यांनी आपसी किरकोळ वादामधुन मृतक नितेश वासुदेव ठाकरे याचा खुन केल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे. यातील आरोपी क्र. १ ते ५ यांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने तर आरोपी सुजीत जयकुमार गणविर ला पोस्टे रामनगर येथील गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख पोस्टे रामनगर यांचे नेतृत्वात सपोनि देवराव नरोटे, सपोनि दिपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा इम्रान खान, पोहवा नितीन साळवे, पोहवा रजनीकांत पुठठावार, पोहव दिपक डोंगरे, पोहवा अजय बागेसर, चापोहवा प्रमोद डंबारे, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं शंशाक बदामवार, पोअं शेखर माधनकर स्थागुशा चंद्रपूर आणि पोस्टे रामनगर यांनी कारवाई केली आहे.

