आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मूल नगराध्यक्ष पदाकरिता काँगेसकडून सौं.एकता समर्थ यांचे नामांकन दाखल..

▪️संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या मूल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार : सौं. एकता समर्थ

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727

मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : 02 डिसेंबर 2025 रोजी होवू घातलेल्या मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह 20 नगर सेवक पदाकरीता निवडणुक रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांनी निवडणुक निर्णय अधिकारी मूल यांचे कडे नामांकन अर्ज सादर केला.

काँग्रेस नेते प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालयापासून भव्य रॅली काढून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून निघालेल्या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार, काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, नगर परिषदेचे माजी सभापती प्रशांत समर्थ, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, महिला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार, शहर अध्यक्ष मिथून पटवा, हार्डवेअर विक्रेता संघाचे दिनेश गोयल यांचेसह काॅंग्रेसचे पदाधिकारी व युवक महिला पदधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.

स्थानिक निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर होवू घातलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी करीता सौ. एकता प्रशांत समर्थ यांचेसह प्रभाग 01 मधून अ.ज.महिला – कु. काजल दिपक धारणे आणि सर्वसाधारण प्रवर्गामधून प्रशांत विलास समर्थ, प्रभाग 02 मधुन ना.मा.प्र.महिला प्रर्वगात सौ. पायल सुनिल महाडोरे आणि सर्वसाधारण प्रवर्गामधून तुकाराम पुंडलीक गुरनूले, प्रभाग 03 मधुन ना.मा.प्र.महिला प्रवर्गात सौ. शालु किशन शेरकी यांनी तर सर्वसाधारण प्रवर्गा मधून मिथून प्रकाश गद्देवार, प्रभाग 04 मधुन ना.मा.प्र.सर्वसाधारण प्रवर्गात राकेश यादवराव रत्नावार आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गात सौ. उज्वला अंकुश कामडी, प्रभाग 05 मधुन ना.मा.प्र.महिला प्रवर्गात सौ. भारती गणेश मेश्राम आणि सर्वसाधारण प्रवर्गात रितीक दिनेश गोयल यांनी, प्रभाग 06 मधुन ना.मा.प्र. सर्वसाधारण प्रवर्गात विवेक बळवंतराव मुत्यलवार आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गात सौ. नलिनी दिनेश आडपवार, प्रभाग 07 मधुन अ.जमाती सर्वसाधारण प्रवर्गा अशोक हिरामण येरमे आणि सर्वसाधारण महिला संवर्गात सौ. समिक्षा जगदिश कडस्कर, प्रभाग 08 मधुन अ.जाती सर्वसाधारण प्रवर्गात अतुल रवि गोवर्धन आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गात सौ. ज्योती चंद्रकांत चटारे, प्रभाग 09 मधुन अ.जाती महिला प्रवर्गात सौ. ललिता सुरेश फुलझेले आणि सर्वसाधारण प्रवर्गात विलास पांडूरंग कागदेलवार आणि प्रभाग 10 मधुन अ.जाती महिला प्रवंर्गामधून सौ.सुशिला डेव्हीड खोब्रागडे आणि सर्वसाधारण प्रर्वगामधून राहुल सुरेश प्रेमलवार यांनी नामांकन अर्ज सादर केले. तेंव्हा काॅंग्रेस पार्टीचा जल्लोष दिसून आला. नामांकन अर्ज सादर करण्याचे शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उबाठा गटातर्फे प्रभाग 01 मधुन महेश चौधरी, प्रभाग 02 मधुन राकेश मोहुर्ले, प्रभाग 05 मधुन नरेश कोल्हे, प्रभाग 06 मधुन आकाश कावळे आणि वैशाली कोठारे, प्रभाग 08 मधुन सौ. टिना ठाकरे आणि प्रभाग 09 मधुन स्वप्नील नागोसे यांनी नामांकन सादर केले.
आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीनेही नामांकन अर्ज सादर करण्यांत आले. उमेदवारी अर्ज सादर करतांना सर्व उमेदवारांशिवाय कार्यकर्त्यां मध्ये प्रचंड उत्साह आणि जिद्द दिसून आल्याने होवू घातलेली निवडणुक अत्यंत चुरशीची होईल,अशी चर्चा आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार मृदुला मोरे यांचे मार्गदर्शनात मुख्याधिकारी संदिप दोडे आणि नायब तहसिलदार प्रविण चिडे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.