▪️न.प.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय भेटी व संवाद..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
गडचांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहर ता. कोरपना आगामी गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (दि.२२) ला शहरात प्रभागनिहाय नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला.
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती,वीज, नवीन विकासकामांची गरज, आरोग्यविषयक अडचणी अशा अनेक मूलभूत विषयांवर विविध प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी आगामी न.प.निवडणुकीत गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे सांगितले. या प्रभागनिहाय भेटीदरम्यान नागरिकांमध्ये न.प.निवडणुकीचा प्रचंड उत्साह दिसून आला.
यावेळी माझ्यासमवेत गडचांदूर शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, व्यापारी संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



