आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन..

▪️ग्रामपंचायत चिरोली (ता. मुल) येथे शुभारंभ..

 

संपादक सौ. शिल्पाताई बनपुरकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 10 : जिल्ह्यात हत्तीरोग दूरीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन मुल तालुक्यातील चिरोली येथे झाले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. मिथीलेश सिंग, डॉ. शिरिषा पटेल, जिल्हा पर्यवेक्षक सुनिल जोशी, मनिभूषण धनवान, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, चिरोली येथील मुख्याध्यापक परमानंद सेलोकर, जिल्हा समन्वयक महेश झरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामेश्वर बावणे, तालुका पर्यवेक्षक महादेव जांभुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कन्नाके उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. तसेच सर्व मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर स्वतः एमडीए-आयडीए औषध सेवन करून मोहिमेबाबत विश्वास निर्माण केला. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीत औषध देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, चिरोली येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.