▪️सर्वांगीण विकास हाच भाजपाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू – आमदार देवराव भोंगळे
▪️मांडवा येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
कोरपना ( इंडिया 24 न्युज ) : केंद्र व राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक व परिवर्तन घडवणारे निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी कल्याणाच्या कामांना प्राधान्य देत विकासाला गती दिली आहे. आमचे राजकारण हे जातीपातीचे नसून सर्वांगीण विकास हाच भाजपाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील मांडवा येथे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन (दि.२० ) ला काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी ते बोलत होते.
आमदार भोंगळे पुढे बोलतांना म्हणाले की, जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.माझ्यावर जनतेने दाखवलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. मी या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे. असेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये रवींद्र नांदेकर ,मंगेश नांदेकर ,दामोदर कोल्हे ,नामदेव वासेकर, संजय नांदेकर ,गणेश पिदुरकर, दिनेश पिदुरकर, विजय गौरकर, बंडू पायघन,दयानंद न्याहारे, संजय लसंते , झिबला लसंते, रुपेश ताजने, मधुकर पायघन,बाळकृष्ण लसंते ,मनोहर कोयटे,पवन कोयटे, पंकज कोयटे, प्रफुल लौट, पांडुरंग राऊत, मनोहर वाघाडे, लक्ष्मण नागोसे, बाबाराव वाघाडे, लक्ष्मण मंडलवार, उद्धव राऊत ,अंकुश कोयटे,माणिक लसंते, अरुण कडू, महादेव जुनघरी, गजानन तांदूळकर, पवन राऊत, बंडू मस्के, वैभव कोल्हे ,मंगेश कोरडे, आनंद नागोसे, विठ्ठल कोयटे, सुधाकर नागोसे, मारोती नागोसे ,मनोज न्याहारे, अमित न्याहारे, रामचंद्र राऊत,बळीराम कोयटे,अंकुश मंडलवार, तीर्थ राऊत, आकाश दुधकाडे, अमोल राऊत, रुपेश खंडारे,राजू राऊत, अजय सरवर ,अंकुश लसंते,भिवाजी फुलाटे, दिनेश पिदुरकर, नितेश भुसारी लक्ष्मण मरस्कोल्हे, किरण वासेकर, संगीता राऊत ,प्रतिमा नांदेकर,रेखा पायघन,वैशाली नांदेकर ,विशाखा कोल्हे, प्रिया राऊत, मंगला तांदूळकर यांचा समावेश आहे.
भाजपात नव्याने प्रक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे कोरपना तालुक्यातील भाजपाचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाले आहे.
याप्रसंगी भाजपचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर , ओम पवार, प्रमोद कोडापे,चनईच्या सरपंच रेश्मा मडावी,कार्तिक गोंलावार, वामन कोल्हे, आनंदराव पायघन, ज्योतीराम कोहचाळे, दिनेश खडसे, भारत सुरपाम,केशव आत्राम, महादेव जुनघरे, बंडू पायघन ,मधुकर पायघन, संभाजी कोल्हे, नामदेव खाडे, नागेश पिदुरकर, बाबाराव राऊत, दिनेश ढेंगळे,शालिनी राऊत,संगीता तलांडे यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



