आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार, सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य, जनतेमध्ये कुजबुज..!

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूलनगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी टक्कर भाजपाच्या प्रा.डॉ. किरण किशोर कापगते- बोरकर आणि काँग्रेसच्या सौ. एकता प्रशांत समर्थ यांच्यातच असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्ट दिसत आहे.काँग्रेसतर्फे असा सवाल उपस्थित करण्यात आला की, “महाविद्यालयीन अध्यापनाच्या कामात व्यस्त असणाऱ्या किरण कापगते नगराध्यक्ष झाल्यानंतर शहरासाठी वेळ कसा देणार?” अध्यापन करून नप, जीप, आमदारकी सांभाळणारे अनेक उदाहरण आहेत, उलट निधीच जर नसली तर नुसतं खाली पिली नगर परिषदेत कुणी नुसतं बसुन काय करणार, प्रा कापगते या आजपर्यंत सकाळ पाळीच महाविद्यालय सांभाळून सामाजिक कार्य करतच आहेत, त्यामुळे महाविद्यालया नंतरचा संपूर्ण वेळ त्या नगरपरिषद कामकाजासाठी देऊ शकतात. अनेक वर्षांपासून त्या सामाजिक,जनसेवा व लोकसेवा क्षेत्रात सक्रिय आहेत आणि वेळेचे नियोजन पद्धतशीर करत आल्या आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन करून त्या नगरपरिषदेसाठी प्रभावीपणे काम करू शकतील, असा त्यांचा विश्वास आहे.याउलट, काँग्रेसच्या उमेदवार सौ. एकता समर्थ या संपूर्ण वेळ नगरपरिषदेला देण्यास तयार असल्या तरी “शासनाकडून पुरेसा निधीच मिळणार नसेल तर वेळ देऊनही विकासकामे कशी होणार?” असा प्रतिप्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन असताना नगरपरिषदेस निधीअभावी कामे ठप्प राहतील, हे वास्तव पटण्याजोगे नसल्याचेही भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे.म्हणूनच, “संपूर्ण वेळ देणारी,पण निधीअभावी विकास करू न शकणारी नगराध्यक्षा योग्य”, की सकाळचा काही वेळ महाविद्यालयासाठी राखून ”उर्वरित वेळ नगरपरिषदेसाठी देत विकास घडवू शकणारी, अनुभवी व सक्षम उमेदवार किरण कापगते योग्य?” असा निर्णय आता मतदार जनतेलाच घ्यायचा आहे.शहरातील वातावरण मात्र याच चर्चेने तापले असून कोणत्या उमेदवारावर जनता अंतिम विश्वास ठेवते हे मतदानातूनच स्पष्ट होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.