अंमली पदार्थमुक्त चंद्रपुरच्या दिशेने आणखी एक पाऊल..
▪️२४ ग्रॅम एमडी पावडर जप्त. आरोपी यास बुटीबोरी पोलीसांच्या मदतीने ठोकल्या बेड्या..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपुर – ( इंडिया 24 न्युज ) : शहरात अंमलीपदार्थाची विक्री व तस्करी करणाऱ्या इंसमांवर प्रभावी कार्यवाही करण्याच्या अनुशंगाने मा पोलीस अधिक्षक श्री आयुष नोपानी सर, यांनी सर्व वरीष्ठ अधिकारी व ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्याबाबत पो स्टे रामनगर प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके यांनी पो स्टे रामनगर शोध पथकास सुचना व मार्गदर्शन केले त्यानुसार पो स्टे रामनगरच्या गुन्हे शोध पथकाने मिळवीलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर येथील राहणारा हनिफ करीम शेख याच्या घरी जावुन छापा कार्यवाही केली असता त्याच्या घरी अंमली पदार्थ (एम डी पावडर) मिळुन आला. आरोपी याला पोलीस आल्याची भनक लागताच त्याने नागपुर च्या दिशेने पळ काढला. त्याअनुशंगाने गोपनीय माहिती व तांत्रीक विष्लेशणाच्या मदतीने आरोपी चा पाठलाग केला असता आरोपी नागपुर च्या दिशेने जात असल्याचे आढळुन आले. त्याअनुशंगाने आरोपी ची माहिती पोलीस निरीक्षक बुटीबोरी यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखुन आरोपी हनिफ शेख याला बुटीबोर टोल प्लाझा याठिकाणाहुन ताब्यात घेतले व आरोपीच्या मागे येणाऱ्या रामनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. अशा प्रकारे २४.२६० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर किंमत अंदाजे ७२,७८० रु, चार इलेक्ट्रानिक वजन काटा किंमत अंदाजे १६०० रु, तसेच ३० झिपलॉक ३० प्लास्टिक पन्नी किंमत -०० रु असा एकुन ७४३८० रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने सरतर्फे कृष्णा दराडे पोलीस उपनिरीक्षक यांच्या लेखी रिपोर्ट वरुन पोस्ट रामनगर येथे अप क्र ११६७ /२०२६ कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करुन तपासात आहे. पुढील तपास पो उपनि सौरभ सांळुंखे पो स्टे रामनगर करीत आहेत. वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, परि पोउपनि सचिन पांढरे, पोलीस अंमलदार बाबा नैताम, आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे. –


