▪️हिणभट्टी फाट्याजवळ भिषण अपघात – २ ठार..
▪️भामरागड - लाहेरी मार्गावरील घटना..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात भामरागड – भरधाव वेगाने जाणारय्या बोलेरो पिकअप दुचाकीची समोरासमोर धडक होऊन या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना भामरागड – लाहोरी मार्गावरील हिणभट्टी फाट्याजवळ घडली राजेश मुरा पुंगाटी ( २५ ) , सन्न झुरू गोटा ( २७ ) दोन्ही रा. नारगुंडा आदींचा मृतकामध्ये समावेश आहे
प्राप्त माहितीनुसार राजेश मुरा पुंगाटी व सन्न झुरू गोटा हे मोटार सायकल क्रं – एम एच ३३ झेड ५३०१ ने जात असतांना विरूद्ध दिशेने येणाय्या बोलेरो पिकअप क्रं – एम एच ३३ टी. ४७५२ सोवत दुचाकीची धडक झाली हा अपघात एवढा जबरदस्त होता की राजेश पुंगाटी हा जागीच ठार झाला सन्नू झुरू गोटा याला भामरागड ग्रामीण रुग्णालय येथून अहेरी करिता रेफर केल्याने त्याला अहेरी येथे नेले जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यु झाला या अपघातात संदर्भात भामरागड पोलिस ठाण्यात गुन्हायाची नोंद करण्यात आली आहे पढील तपास भामरागड पोलिस करीत आहेत.



