ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम महाविद्यालयात जमा करावी..

▪️समाजकल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 30 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून सुधारीत निधी वितरण कार्यपध्दती अवलंब करावयाची आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत अर्ज संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत मंजूर झाल्यानंतर त्या शैक्षणिक वर्षाची अनुज्ञेय शिष्यवृत्ती रक्कम प्रणालीद्वारे निश्चित करण्यात येते. सदरहु मंजूर करण्यात आलेली संपुर्ण शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्क इत्यादी) तसेच विद्यार्थ्याला देय असणारा भाग (निर्वाह भत्ता) या दोन्ही भागांच्या एकत्रित रक्कमेचा केंद्र हिस्सा 60 टक्के या प्रमाणात लाभाची रक्कम केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरीत महाविद्यालयास देय असलेली 60 टक्के रक्कम सात दिवसांच्या आत महाविद्यालयाकडे जमा करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून अर्जामध्ये नोंद असलेल्या एकूण शुल्काची रक्कम पाहावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.