▪️सुभाष ग्राम ग्राम पंचायतचे परिसारत ग्राम पंचायतचे दुर्लक्षमुळे सुभाषग्राम क्षेत्र आरोग्यचा धोक्यात

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी तालुक्यात येनारे सुभाषग्राम शहरात ग्रामपंचायतकळुन कोट्यावधी खर्च करुन रावविण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्णपणे कोलमडला आहे ओला – सुका अनेक प्रभागांत 5 ते 6 दिवसांचा कचरा रस्त्यावर कुजत पडुन आहे नाल्याची स्वच्छता ठप्प झाल्याने दुर्गंधी असह्य वनली आहे आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
घनकचरा व्यवस्थापन कोसडल्यामुळे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे ग्रामपंचायतचे संपूर्ण प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करा छुप्या राजकीय हस्तक्षेपाचा तपास करण्याच्या मागण्या न मानल्यास व्यापक आंदोलन छेडण्याची चेतावनी देण्यात आली आहे प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले न उच्लल्यास शहरात कायदा – सुव्यवस्थेची स्थिति विगडू शकते.
सुभाषग्राम शहराची स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्या हा आमचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे कचरा संकलन ठप्प होणे, करारातील अटींचे उल्लंघन, तसेच देयकांतील नियमितता अत्यंत गंभीर आहे याबावत चौकशी करण्यास सांगितले आहे हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न ठळकपणे मांडला जाईल.
करारानुसार कचरा विलगीकरण केंद्रावर किमान 3-4 मजुर आवश्यक आहेत परंतु प्रत्यक्षात 1 मजुर दिसतात विलगिकरण कंपोस्ट, खतनिर्मिती सर्वकाही ठप्प असतानाही ग्रामपंचायतला दर वर्ष लाखोंची देयके मंजुर होत असल्याने नागरिकांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे की, कामच नाही, तर देयके कशी मंजुर झाली? कचरा गोळा करणाया कामगांरांनही मास्क, गमबूट, हाथमोजे अशा मुलभुत सुरक्षा साधनाचा पूरवठा होत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.



