ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️यशोधरा विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा डोळे पाणावणारा निरोप समारंभ..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांना प्रेम,आदर आणि कृतज्ञतेने भरलेला निरोप दिला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके होते,तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक प्रशांत वालदे, प्रा.भांडेकर व प्रा. गव्हारे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभीच वातावरणात हळुवार भावनिकता पसरली होती. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर काहींनी आठवणींना उजाळा देत हसतमुखाने शालेय जीवनाचे क्षण सांगितले. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी म्हणाले,“याच विद्यालयाने आम्हाला केवळ शिक्षणच नाही, तर संस्कार, शिस्त आणि जीवन जगण्याची दिशा दिली. आज इथून निरोप घेताना मन जड झाले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी कु. काजल यादव गव्हारे हिने अतिशय संवेदनशील पद्धतीने केले, तर प्रास्ताविक वर्गशिक्षक प्रा. गव्हारे सर यांनी केले. त्यांच्या शब्दांतून शिक्षक-विद्यार्थी नात्याची घट्ट वीण आणि आपुलकी स्पष्ट जाणवत होती.समारोपाच्या भाषणात प्राचार्य शाम रामटेके यांनी विद्यार्थ्यांना भावनिक पण प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “परीक्षेच्या वाटेवर जाताना भीती मनात ठेवू नका. या विद्यालयाने तुम्हांवर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवा आणि कष्टाच्या जोरावर तुमचे स्वप्न पूर्ण करा.” त्यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनाला नवी ऊर्जा मिळाली.
या निरोप समारंभाला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा सोहळा केवळ निरोपाचा नव्हता, तर आठवणी, प्रेम आणि प्रेरणेचा अनोखा संगम ठरला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.