आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्हयातील महाविद्यालयीन परिसरातून अमली पदार्थांचे..

▪️प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि प्राचार्यांची संयुक्त बैठक संपन्न..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन प्राचार्यांची एक अत्यंत महत्त्वाची चर्चासत्र बैठक पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश महाविद्यालयीन परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे तसेच जिल्ह्याला पूर्णपणे अमली पदार्थमुक्त करणे हा होता. उपस्थित सर्व प्राचार्य यांना सुरक्षा मंत्र पुस्तिका वाटप करण्यात आले. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे- व्यसनाचे दुष्परिणाम व जनजागृतीः महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेकडे वळू नये म्हणून नियमित समुपदेशन व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

हॉटस्पॉट्स ची ओळख व कडक प्रतिबंधात्मक कारवाईः महाविद्यालय परिसर तसेच इतर भागांतील अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणाऱ्या संशयित ठिकाणांची (हॉटस्पॉट्स) तात्काळ माहिती घेऊन त्यावर अत्यंत कडक व परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्राचार्यांचे महत्त्वपूर्ण योगदान व सूचनाः बैठकीदरम्यान उपस्थित प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनतेची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत, त्यांच्यातील संभाव्य व्यसनाची ओळख पटवून योग्य वेळी त्यांना मदत कशी करावी, यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आपले विचार मांडले आणि विविध व्यावहारिक सूचना सुचवल्या.

सर्व विभागांच्या समन्वयाने समूळ उच्चाटनाचा निर्धारः प्राचार्यांनी दिलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत, पोलीस प्रशासन व इतर संबंधित विभागांशी योग्य समन्वय साधून जिल्ह्यातून अमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्याचा दृढ निर्धार या बैठकीत करण्यात आला. पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अमली पदार्थ माफियांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल. या मोहिमेत सर्व महाविद्यालये, प्राध्यापक आणि पालकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे.

प्रमुख उपस्थितीः सदर महत्त्वपूर्ण बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर, भरोसा सेल, तसेच दामिनी पथक व सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील ५२ प्राचार्य प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.