▪️अहेरीतील विद्यार्थ्यांना घडविली भामरागडची निशुल्क शैक्षणिक सहल शाहीन हकीम यांचा पुढाकार..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : अहेरी शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच निसर्ग, इतिहास व संस्कृतिची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने दृष्टि फाउंडेशनच्या वतीने भामरागड येथे एकदिवसीय निशुल्क शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले दृष्टि फाउंडेशनच्या अध्यक्ष शाहीन हकीम यांच्या पुढाकारातुन हा उपक्रम राबविण्यात आला
या शैक्षणिक सहलीत अहेरी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पास भेट देत डॉ. प्रकाश आमटे यांच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली तसेच भामरागड येथील ऐतिहासिक त्रिवेणी संगम, निसर्गरम्य परिसर आणि स्थानीय आदिवासी संस्कृतिचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली
मार्गदर्शन करताना शिक्षकांनी भामरागडचा ऐतिहासिक वारसा, भौगोलिक वैशिष्ट्येतसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला अनेक विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच शैक्षणिक सहल असल्याने त्यांचा चेहय्यावर आनंद झळकत होता
अभ्यासाबरोबरच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले दृष्टि फाउंडेशनतरफे शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येणारे असल्याचे शाहीन हकीम यांनी सांगीतले ही शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद, स्वयंसेवक तसेच पालकांनी सहकार्य केले या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांसाठी ही सहल प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.



