▪️महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरट्यांचा हल्ला..
▪️१७० ग्रॅम सोने व तीन लाख ६६ हजार रुपयांवर डल्ला..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
नागभिड – ( इंडिया 24 न्युज ) : नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेत काल (२८) रात्रीच्या सुमारास खिडकी फोडून चोरट्यांनी १७० ग्रॅम सोने व तीन लाख ६६ हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना घडली.
नागभिड पोलिस ठाण्यात आज (२९) तक्रार दाखल झाल्यानंतर मोहाडी (मोकासा) येथील महाराष्ट्र तक्रारीची दखल घेऊन पंचनामा करीत शोध तपासाला गती मिळाली.
घटना स्थळी भेट दिली असता तपास सुरू असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक शेख मोहसीन शेख, करिक्षा धकाते सह व्यवस्थापक, सुशांत जवंजाळ रोखपाल आणि शिपाई प्रभात शेंद्रे कार्यरत असून ,सकाळी बँक उघडताच सदर प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक रमाकांत कोकोटे यांच्या चमूने
बँकेत भेट देऊन पाहणी केली तपासणीनंतर आणि बँक कर्मचारी चर्चेनंतर चोरट्यांनी रोख रक्कम व सोने चोरीला गेल्याचे आढळून आले.
कायद्याच्या उद्देशाने वापरले जाणारे कोणतेही विज्ञान म्हणजे फॉरेन्सिक सायन्स, जे गुन्ह्यांच्या तपासासाठी पुरावे गोळा करणे, विश्लेषण करणे आणि सादर करणे यावर लक्ष केंद्रित करते. यामुळे तंत्रज्ञान युक्त वाहन घटना स्थळी उपस्थित झाले होते.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रमाकांत कोकोटे, उपनिरीक्षक किशोर वैरागडे करित आहे.



