आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गोंडपिपरी तालुका पूरग्रस्त भागाची पाहणी : आमदार देवराव भोंगळे

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

गोंडपिपरि – ( इंडिया 24 न्युज ) : माझ्या राजुरा मतदारसंघात मागील महिन्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, तोहोगाव , वेजगाव, सकमूर, लाठी, सरांडी , धाबा, अडेगाव परिसरातील नदीकाठावरील शेतीचे खूप मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्त भागाची काल (दि.२) पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

वर्धा नदीला पुर आल्याने नदीकाठावर असलेल्या अनेक गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यंदाही पुरामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आणि धान यासारखी डौलदार पिके पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी उध्वस्त झाले.
नदीपट्ट्यातील पुराच्या आधी हिरवीगार दिसणारी पिके आता पुरामुळे पूर्णतः भकास झाली आहे.त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची तातडीने भरपाई देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी माझ्यासमवेत भाजपाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प.सदस्य अमर बोडलावार, कृ.उ.बा.स.सभापती इंद्रपाल धुडसे, सरपंच कल्पना चौधरी, राकेश पुन, भानेश येग्गेवार, वनकर, समीर निमगडे, नितेश तुंबडे स्वप्निल अनमोल वार संतोष मुगलवार, चंद्रजीत गव्हारे ,बाळू दिंगलवार, संदीप पौरकर, विलास नागपुरे, विजय चौधरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.