ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राजोली गावातील घरकुल धारकांना शासन नियमाप्रमाणे तात्काळ रेती उपलब्ध करून द्या -अजिंक्य पाटील मारकवार, जिल्हाध्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : सर्वसामान्य माणसाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हनुन महाराष्ट्र शासनाने अनेक वेगवेगळ्या योजना राबवीत सर्वसामान्य माणसाला घरकुलाचा लाभ देऊन दिलासा दिला. पण घरकुल बांधकामात रेतीची मुख्य अडचण येत असल्यामुळे शासनाने यातून मार्ग काढीत प्रत्येक घरकुल धारकांस मोफत पाच ब्रास रेती देण्याचे धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी तालुका प्रशासनावर सोपविली.पण अजूनही राजोली येथील 360 घरकुल धारकांना रेती उपलब्ध न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य पा. मारकवार यांनी तहसीलदार मुलं यांची भेट घेत तात्काळ मोफत रेतीसाठी टीपी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या योजनेतर्गत सर्वसामान्य माणसाला त्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हनुन घरकुल योजना राबवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला परंतु सदर बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नसल्यामुळे शासनानाने मान्यताप्राप्त रेती घाटावरून प्रत्येक घरकुल धारकास मोफत पाच ब्रास रेती उपलब्ध करुंन देण्याचे धोरण जाहीर करून यांची जबाबदारी तालुका प्रशासनाकडे सोपवली पण अजूनही रेती मिळाली नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.तालुक्यातील रेती घाटातून रोज मोट मोठया हायवा गाड्यानी रेती वाहतूक होत असताना घरकुल लाभार्थीना रेती उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला कोणती अडचण येत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाकडून विचारला जात आहे.
या घरकुल लाभार्थीना होणारी अडचण लक्षात घेऊन राजोली येथील शिष्टमंडळाने अजिंक्य पा. मारकवार याच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुल यांची भेट घेऊन तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्याची मागणी केली. यावेळी शिष्टमंडळात माजी ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम धारणे,प्रकाश गोडे, रवी नन्नावरे, हितेश दडमल आणि राजोली येथील नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.