ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महावितरणचे संचालक राजेन्द्र पावार यांनी पेरमिली उपकेंद्राची घेतली चाचणी..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) महावितरणच्या मुंबई येथील कार्यालयातील संचालक राजेन्द्र पावार यांनी गडचिरोली जिल्हा दौय्या दरम्यान भामरागड उपविभागातील पेरमिली येथील नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राची चाचणी घेतली या भेटीदरम्यान त्यांनी उपकेंद्रातील तांत्रिक कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केली
या उपकेंद्रामुळे संबंधित परिसरातील ग्राहकांना अधिक योग्य दाबाचा व अखंडित आणि दर्जेदार वीज सेवा उपलब्ध होणार असुन सेवा कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार असे सांगण्यास मदत होणार असे सांगण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे होते प्रमुख अतिथी म्हणुन गडचिरोली मंडळाचे अधिक्षक अभियंता खाडेकर चंद्रपुर मंडळातील पायाभुत आराखडा विभागाचे रमेश सानप प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमास अल्लापल्ली विभागांअंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.