▪️ठाकरी येथील कॅन्सरग्रस्त महिलेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी दिला मदतीचा हात..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : आष्टी ठाकरी येथील मनीषा मोरेश्र्वर आलेवार या महिलेला कॅन्सर आजाराने ग्रासले घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचारासाठी आर्थिक चणचणीचा सामना करावा लगत आहे ही बाब शिसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना कळताच त्यांनी ठाकरी येथे जाऊन मनीषा आलेवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली व उपचारासाठी आर्थिक मदत केली मनीषा आलेवार आर्थिक मदत देतांना शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या सह ठाकरी च्या सरपंच नंदाताई कुलसंगे उपसरपंच विठ्ठलराव आचेवार राजु माडेमवार राजु बोलकुंडवार हणमंतु जोरगलवार,गणेश अप्पनवार विजय अप्पनवार गणेश डोमटवार विलास मुत्तेवार आदी उपस्थित होते
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे हे नेहमीच गोरगरीब गरजू रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात,त्यांनी ठाकरी येथील कॅन्सरग्रस्त महीलेला उपचारासाठी मदतीचा हात देवुन सेवाभावी वृत्तीचा परीचय दिला आणि सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले.



