ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

13 फेब्रुवारी रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, हॉल क्र. 5 व 6 चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर आदी शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांना विविध क्षेत्रातील उपलब्ध रोजगार संधींची माहिती व प्रत्यक्ष मुलाखतीची संधी मिळावी, तसेच स्थानिक उद्योजक आणि नोकरी इच्छुक उमेदवार यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 50 पेक्षा अधिक रिक्त पदे भरण्यात येणार असून विदर्भ क्लिक 1 सोल्युशन, चंद्रपूर तसेच एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स, चंद्रपूर (फिल्ड वर्क) या नामांकित कंपन्यांकडून तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या प्रती तसेच किमान तीन प्रती रिझ्युमेसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे दूरध्वनी क्रमांक 07172-252295 वर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा तसेच www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.