▪️इरई नदी पिवळी पूररेषा आखणीबाबत नागरिकांच्या सूचना आमंत्रित
▪️20 फेब्रु. ते 8 मार्चपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि.१२ : इरई नदीलगत चंद्रपूर परिसरातील कढोली, चिंचोली, वढोली, पायली, किटाळी, मिनगांव, चांदसुर्ला, लोहनविचोडा, अंबोरा, विचोडी बु., नेरी, पडोली, लखमापूर, वडगांव, चांदा रै. कोसरा, रहमत नगर, बालाजी वार्ड, नगिनाबाग, सिस्टर कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर, दाताळा, देवाडा, बोररिठ, आरवट, चारवट, नांदगाव पोडे, हडस्ती या गावांमध्ये पुरबाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणीचे काम चंद्रपूर पाटबंधारे विभाग, चंद्रपूर या विभागामार्फत 1 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत स्थानिक नागरिकांशी संवाद साधून व पुरस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती गोळा करण्यात आली.
इरई नदीच्या पुरपरिस्थितीबाबत गोळा करण्यात आलेल्या माहिती व पिवळी पूररेषा आखणीबाबत नागरिकांना कोणत्याही सुचना अथवा प्रत्यक्ष जागेसंबंधी माहिती द्यावयाची असल्यास 20 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग (सिंचन), सिव्हील लाईन, चंद्रपूर या कार्यालयात अर्ज विहीत नमुन्यात माहिती भरून सादर करावा. नागरिकांनी सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, असे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंह यांनी कळविले आहे.



