ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मेंढपाळाच्या कळपावर चालविला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक

▪️१५ मेंढ्याचा जागीच मृत्यू तर अकरा मेंढ्या जखमी दोन्ही मेंढपाळ बापलेक गंभीर..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी : ( इंडिया 24 न्युज ) – गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने मेंढ्यांच्या कळपावर ट्रक चालवित १५ मेंढ्यांना ठार केले व ११ मेंढ्या जखमी झाल्या तसेच मेंढपाळ बापलेक गंभीर झाल्याची घटना आज दि. १३ फेब्रुवारी ला पहाटे पाच वाजताचे दरम्यान चामोर्शी ते दहेगाव नाल्याजवळ घडली. दोन्ही मेंढपाळ बापलेकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
सदर मेंढपाळ हे चामोर्शी कडून रामाळा या गावाकडे पहाटेच्या सुमारास आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना त्यांच्या मागे येत असलेल्या ट्रकने कळपावर ट्रक चालविला त्यामुळे त्यांना बाजूला करण्याचे काम करीत असलेले बापलेक गंभीर जखमी झाले
मारोती रामा अन्नावर व अतुल मारोती अन्नावर रा. बोरचांदली जिल्हा चंद्रपूर असे त्यांचे नाव आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
त्यांच्या १५ मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या असून ११ मेंढ्या अखेरची घटका मोजत आहेत त्यामुळे त्यांची लाखो रुपयांची नुकसान झाली आहे
त्वरीत ट्रक मालकाने किंवा कंपनीच्या माध्यमातून नुकसान भरपाई द्यावी व गंभीर बापलेकांचा उपचार करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.