◼️मौजा सरांडी येथील वन जमिनीवरील २.२० हे.आर अतिक्रमण हटविण्याची कारवाई

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज): दि. १६/०२/२०२६
मौजा सरांडी ता. सिंदेवाही येथिल गट क्र. ४९ मधील वन जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध आज दि.१६/०२/२०२६ रोजी वन विभागामार्फत मोठी कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मा. जिल्हा वनहक्क समिती तथा अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच मा. उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी वनविभाग, ब्रह्मपुरी व मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व वन्य.) ब्रह्मपुरी यांचे आदेशान्वये राबविण्यात आली.
मौजा सरांडी येथील गट क्रमांक ४९ चे एकूण क्षेत्र १६.७० हे.आर असून त्यापैकी खालील व्यक्तीने एकूण २.२० हे. आर वनजमिनीवर अतिक्रमण केले होते.
१. श्री वसंत राजाराम गुरगुले -०.३६ हे.आर
२. श्री गोकुल विठोबा मोहरले -०.३८ हे.आर
३. श्री एकनाथ मोहन मांदाडे – ०. ५५ हे.आर
४. श्री शांताराम श्रावण आदे -०.३५ हे. आर
५. श्री बाजीराव सितकुरा मोहुर्ले ०.५० हे.आर
( सर्व रा. सरांडी )
मा. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अरविंद जे. सहाय्यक वनसंरक्षक ( प्रादे. व वन्य. ) ब्रह्मपुरी तसेच डॉ. एम. बी. गायकवाड सहायक वनसंरक्षक (तेंदु )ब्रह्मपुरी, अंजली सायंकार वनपरिक्षेत्राधिकारी (प्रादे.) यांच्या उपस्थितीत सदर कारवाई पार पडली.
कारवाई दरम्यान श्री आर. आर. सिडाम (क्षे.सा. नवरगाव) श्री ओ. व्ही. चहांदे (बिट व.र. रत्नापूर ) श्री एस. बी. उसेंडी (वपअ खडसंगी) श्री एस एन कांबळे (वपअ अ.नि.) ब्रह्मपुरी तसेच सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील सर्व क्षेत्र सहाय्यक/ वनपाल /वनरक्षक/ वनमजूर व पी. आर. टी. टीम सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय अक्षय पवार, श्री विनायक ब्राह्मणकर, श्री गौरव रायते, कु. श्वेता निमुणकर कु. शितल पवार (वपअ परिविक्षाधीन) ब्रह्मपुरी, कु. रोशनी कोल्हे (मंडळ अधिकारी नवरगा श्री एम. बी. गुरनुले (ग्रा.वि.अधि. शिवनी) फिरते पथक खडसंगी/ ब्रह्मपुरी येथील वन कर्मचारी कु. राणी भोंडवे ( सपोनी पो.स्टे.सिंदेवाही) श्री विलास निंबाळकर (सहा.उपनिरीक्षक पो.स्टे. सिंदेवाही) व त्याचे अधिनस्त कर्मचारी, यांच्या उपस्थितीत अतिक्रमण धारकाच्या समक्ष अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई पूर्ण करण्यात आली.
सदर कारवाईत मौजा सरांडी येथील सबंधित ५ इसमाचे एकूण २.२० हे. आर वनक्षेत्रावरील अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात आले असून वन जमीन शासन ताब्यात घेण्यात आली आहे.



