▪️अनुलोम मित्र मेळाव्यात शासकीय योजनांची माहिती..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
कुनघाडा रै – ( इंडिया 24 न्युज ) : शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र यांच्या वतीने पंचायत समिती चामोर्शी येथील सभागृहात अनुलोम मित्र मेळावा पार पडला.मेळाव्यात अधिकारी वर्गाकडून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चामोर्शी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माधुरी येरमे ह्या होत्या तसेच उमेदचे तालुका समन्वयक तुषार कर्णे , हिवराज मेश्राम, आर एस ठाकरे, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक संतोष जाधव, कृषी विस्तार अधिकारी पी आर श्रीरामे, सहाय्यक कृषी अधिकारी एस व्ही उईके, अनिकेत झाडे, दर्शना सोडते, तालुका कृषी अधिकारी रोशनी बुटे, अनुलोम उपविभाग प्रमुख अमित मोरांडे, भाग जनसेवक विनायक कुनघाडकर, टीएमओ योगिता सातपुते आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
गटविकास अधिकारी माधुरी येरमे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माला अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व अनुलोम मित्रांनी शासकीय अधिकाऱ्यांना स्वतःचा परिचय करून दिला. गडचिरोलीचे उपविभाग भाग जनसेवक अमित मोरांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून
अनुलोम संस्थेचा परिचय, शासकीय योजनेत केलेले कार्य, विविध शासकीय योजना, अनुगामी लोकराज्य महाभियान अंतर्गत होणारे विविध उपक्रम,
अनुलोम रचनेबद्दल सखोल माहिती दिली. अनुलोमच्या कार्यामध्ये अनुलोम मित्राचे सहकार्य याबाबत समजावून दिले. संवादिनी संदर्भात सगळ्या अनुलोम मित्र आणि शासकिय अधिकारि यांना माहिती दिली. सर्व अधिकारी यांनी अनुलोमच्या कार्याची व अनुलोम मित्र. शासनाच्या योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य करीत आहे. त्यामुळे अनुलोम मित्रांना शासकीय योजना बाबत मदत करू. अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन विनायक कुनघाडकर यांनी केले तर आभार काशिनाथ चिचघरे यांनी मानले.



