आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या निवड उमेदवारांना हिरवी झेंडी दाखवून प्रशिक्षणासाठी नागपूरकडे रवाना..

▪️रुग्णाच्या सर्वात जवळ नर्सिंग कर्मचारी; सेवाभाव हीच खरी ओळख : आमदार डॉ. मिलिंद नरोटे

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

मेंढा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ३ ऑगस्ट : डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (DHHARI), मेंढा येथे सुरू होणाऱ्या अत्याधुनिक आरोग्यसेवा प्रकल्पासाठी नर्सिंग तसेच विविध पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या विशेष प्रशिक्षणासाठी नागपूर येथील National Cancer Institute येथे आज हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, ROLE संस्थेचे सचिव गोविंदजी सारडा, कोषाध्यक्ष हेमंतकुमार राठी तसेच भाजपा तालुका महामंत्री रमेशजी नैताम उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे म्हणाले की, “रुग्णाच्या सर्वात जवळ डॉक्टरांपेक्षाही नर्सिंग व आरोग्य कर्मचारी असतात. त्यामुळे सेवाभाव, संवेदनशीलता आणि समर्पण हीच तुमची खरी ओळख ठरली पाहिजे. प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान, कौशल्य आणि आधुनिक वैद्यकीय कार्यपद्धती आत्मसात करून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी स्वतःला समर्पित करा.”

डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दुर्गम व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात अत्याधुनिक व तज्ज्ञ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही प्रशिक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक वैद्यकीय सेवा आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उपक्रमामुळे भविष्यात हॉस्पिटलमध्ये कार्यरत होणारे प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक सक्षम होऊन जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.