आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️संविधान जागृती प्रश्नमंजुषा 2025-26 ला उत्स्फुर्त प्रतिसाद..

▪️न्यायमुर्ती जावळकर यांच्यासह इतर मान्यवरांचे मार्गदर्शन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

मुंबई/चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) दि. 19 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘संविधान जागृती प्रश्नमंजूषा 2025-26 या राज्यव्यापी उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई येथील डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांच्यामार्फत हे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जात आहे.

या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) न्या. एम. एस. जावळकर, यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक अमूल्य मार्गदर्शन केले. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी उत्तरे देत संविधानाबद्दल जागरूक नागरिकत्वाची भावना दृढ केली. या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच माजी आयुक्त (समाज कल्याण) इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन मोनाल थुल यांनी केले. डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे व डॉ. आरती तायडे यांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली. राज्यातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.