ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️वन्यप्राणी चितळ प्रकरण मास व चामडे जप्त करीत चार जणांना अटक! भाडभिडी उपवन क्षेत्राची कारवाई..

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीप : उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येथील वन परिक्षेत्र अंतर्गत भडभीडी उपवन क्षेत्रातील रेखेगाव जंगल परिसरात धाड टाकत
वन्यप्राणी चितळाचे मांस व चामडे जप्त करून चार जणांवर कारवाई केल्याची घटना घडली,
गुप्त माहितीच्या आधारे
वन परिक्षेत्र अंतर्गत भडभीडी उपवन क्षेत्रातील रेखेगाव जंगल परिसरात धाड टाकत घटनास्थळी ११.४०० किलो वजनाचे वन्यप्राणी चितळाचे मास व चामडे जप्त करत राजीव कांदो, वैभव तिमा, नरथ कोवासे, संतोष हेडा राहणार रेखेगाव या चार जणांना वन्य जीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली सदर कारवाई चामोर्शी वनपरिक्षेत्राधिकारी आर बी इनवते यांच्या मार्गदर्शनात भडभीडी क्षेत्रसायक व्ही एस
चांदेकर, वनरक्षक आर बी राऊत, धानोरकर, कुलेटी,
दांडिकवार, शामराव आडे,संतोष यांच्यासह शामराव कांदे व संतोष इनाम या पंचसमक्ष कारवाई करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.