ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️एस.एस.सी च्या विद्यार्थ्यां करीता ” एस.एस.सी च्या परीक्षेला कसे सामोरे जावे” यावर आधारित शिबिर संपन्न..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

पुणे शिवाजी नगर, ( इंडिया 24 न्युज ) : एस.एस.सी च्या विद्यार्थ्यां करीता ” परीक्षेला कसे सामोरे जावे” यावर आधारित शैक्षणिक शिबिराचे आयोजन नुकतेच
कारवा फाऊंडेशन,अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि दी गोवंडी टीचर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच म.न.पा शाळा क्रमांक -२, शिवाजी नगर, गोवंडी याठिकाणी करण्यात आले होते.
सदरहू शिबिरामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक समोपदेशिका सौ.पाकीजा अत्तार तसेच Leadership and Peak performance Coach समीर नारद आणि सेन्ट
झेवियर्स च्या रिमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
सौ.पाकीजा आत्तार यांनी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवताना येणाऱ्या अनेक अडचणींचा वेध घेतला आणि अभ्यासक्रमानुसार प्रश्नांचे आणि त्यांच्या उत्तराचे उत्तमरीत्या सादरीकरण केले.
रिमा चौधरीयांनी सामाजिक
शास्त्र या विषयाच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचे बारकावे स्पष्ट केले.त्याचे उत्तर कसे असावे याचे सुध्दा त्यांनी विश्लेषण केले.
समीर नारद यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आपले ध्येय निश्चित करून कशा प्रकारे वाटचाल करावी याबाबतचे अनेक दाखले दिले. त्याचप्रमाणे परीक्षेला सामोरे जाताना सकारात्मक उर्जा कशी निर्माण करावी, याबाबतचे उत्कृष्टपणे विवेचन केले. सदरहु कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जावेद खान यांनी केले. तर शायना मिराजानकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉक्टर आलम खान यांनी अतिथीचा परिचय करून दिला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक जमीर कुरेशी, नगरसेविका मेहजबीन खान,अमरदीपच्या सौ. सलमा खान,एन.डी.खान, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, दिपक कदम,मुबीन शायदा, फिरोज पटेल हे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.